shivsena.jpeg
shivsena.jpeg 
नाशिक

भाजपविरूध्द शिवसेनेचे ‘कुंभकर्ण’ आंदोलन...

सरकारनामा ब्युरो

जळगाव : "जागे व्हा, जागे व्हा.. झोपलेले सत्तेचे कुंभकर्ण जागे व्हा, रस्त्यातील खड्डे बुजवा.." अशा घोषणा देत शिवसेनेने जळगाव महापालिकेतील भाजपविरूध्द आंदोलन केले. यावेळी आयुक्तांचाही निषेध करण्यात आला आहे. जळगाव शहरातील रस्त्यावर मोठ मोठे खडडे पडले आहेत. 

पावसाळ्यात अनेक ठिकाणी या खड्डयात पाणी साचल्यामुळे रस्त्यावरून पायी चालणेही कठीण झाले आहे. जळगाव महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याला सत्ता दिल्यास आपण एका वर्षात शहराचा कायापालट करून दाखवू अशी ग्वाही दिली होती. मात्र, आज दीड वर्षे झाल्यानंतरही शहरात कोणत्याही सुधारणा न झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील खड्डे बुजवावे या मागणीसाठी शिवसेनेतर्फे रस्त्यावर ‘कमळ’लावण्याचे आंदोलन करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही शहरातील रस्त्यावरचे खड्डे बुजविण्यबाबत महापालिकेच्या सत्ताधिकऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे शिवसेनेने आज पुन्हा आंदोलन केले.
  
शिवसेनेतर्फे निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिकात्मक कुंभकर्ण आंदोलन करण्यात आले आहे. कुंभकर्ण बनलेला कार्यकर्ता महापालिकेच्या कार्यालयासमोर झोपवून त्याच्या भोवती कार्यकर्त्यानी घोषणा दिल्या. "सत्ताधारी कुंभकर्ण जागे व्हा, जागे व्हा, शहरातील खड्डे बुजवा," असे फलक हातात देवून घोषणा दिल्या. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

याबाबत शिवसेनेचे निलेश पाटील पाटील म्हणाले, "जळगाव शहरातील रस्त्याच्या संदर्भात आम्ही वेळोवेळी आंदोलन केले, तसेच निवेदनही दिले आहे. मात्र आयुक्तांना त्याबाबत कोणतीही जाण नाही. ते शहरातील समस्येकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांनी जागे होउन शहरातील समस्येकडे लक्ष द्यावे, यासाठी आम्ही प्रतिकात्मक कुंभकर्ण आंदोलन केले. 

‘जागे व्हा..जागे व्हा’अशा घोषणा दिल्या. मात्र यानंतरही जर महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने शहरातील रस्त्याच्या खड्डयांच्या समस्येबाबत लक्ष दिले नाही, यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करणार आहोत असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

Edited  by : Mangesh Mahale    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT